बगदाद – इराकची राजधानी बगदाद शहरातील विविध ठिकाणी झालेल्या नऊ बॉम्बस्फोटात 30 जण ठार झाले. तर 100 हून अधिक जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शहरातील विविध आठ ठिकाणी गाडीत हे स्फोट झाले. हे स्फोट शिया वस्तीत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
बगदादमध्ये बॉम्बस्फोटात 30 ठार
याआधी शहरातील सुन्नी मशीदीच्या जवळ शुक्रवारी झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जण ठार झाले होते. तर 23 सप्टेंबर रोजी आणि 21 सप्टेंबर रोजी झालेल्या स्फोटात अनुक्रमे 23 आणि 73 जण ठार झाले होते. सुरक्षा दलांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षभरात शहरात झालेल्या बॉम्बस्फोटात 840 जण ठार तर चार हजार 600 जण जखमी झाले आहेत.
