आगामी काळात येत असलेल्या दिग़दर्शक संजय लीला भन्साळीच्या यांच्यात बहुचर्चित ‘रामलीला’ या सिनेमात अभिनेत्री प्रियंका चोप्रा आयटम साँग करणार आहे. या आयटम साँगसाठी आधी अभिनेत्री ऐश्वर्या रॉयचे नाव घेतले जात होते. मात्र, ती केवळ एक अफवा ठरून ‘बबली बदमाश’ या आयटम साँगने सर्वांवर जादू करणा-या प्रियांका चोप्राच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
रामलीला’मधील या सिनेमातील प्रियांकाच्या आयटम साँगचे शुटींग काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले असून या गाण्याद्वारे ती सर्वांना मोहित करण्यास सज्ज झाली आहे. आता या गाण्यायचा फस्ट लूक देखील तयार झाला असून तो बाजारातदेखील आला आहे. सध्या या गान्याची सर्वत्र चर्चा सुरू असून हे गाणे आगामी काळात हिट ठरेल असे वाटते.
‘रामलीला’मधील आयटम साँगचे नृत्य दिग्दर्शन प्रभूदेवाचा भाऊ विष्णू देवा याने केले आहे. फिल्मसिटीमध्ये या गाण्याकरिता एक विशेष सेट उभारण्यात आला होता. विष्णू देवा हा प्रियांकाच्या नृत्याने प्रभावित झाला असून त्याने याबद्दलचे ट्विटही केले आहे. प्रियांकाने नुकतेच ‘जंजीर’ आणि ‘शूटआउट अट वडाला’ या सिनेमासाठीदेखील आयटम साँग केले होते.