रणबीर कपूर भडकला मीडियावर

बॉलीवूडमधील मंडळी आणि मीडियातील पत्रकार यांच्यातील संबध कधी चांगले असतात तर कधी काही घटनांचा राग आल्याने बिघडतात. बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता रणबीर कपूर यांने नुकतीच प्रेस कॉन्फ्रन्स आयोजीत केली होती. यावेळी पत्राकांरानी त्याला काही अपेक्षीत नसलेली प्रश्ना विचारल्यानने तो चांगलाच भडकला होता.

अभिनेता रणबीर कपूर सध्या आगामी ‘बेशरम’ या सिनेमाच्याल प्रसिद्धीमध्ये व्यस्त आहे. पण, गेले काही महिने रणबीर त्याच्या सिनेमापेक्षा कतरिनासोबतच्या स्पेनमधील फोटोंमुळे जास्त चर्चेत आहे. शनिवारी रणबीरचा ३१वा वाढदिवस झाला. त्या अनुषंगाने पत्रकारांनी त्याला बेशरमच्या प्रमोशनवेळी कतरिनाने वाढदिवसाची काय भेट दिली? असा प्रश्न केला. ‘माइंड यूअर ओन बिझनेस’. याचाच अर्थ तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा, असे पत्रकारांवर रागावलेला रणबीर म्हणाला.

कतरिना-रणबीर पुन्हा हॉलीडेसाठी परदेशी जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. याबाबत त्याला विचारले असता, फोटो प्रदर्शित झाल्यावर तुम्हाला कळेलच, मी काय म्हणणार, असे रणबीरने उत्तर दिले आणि याव्यतिरीक्त त्याने जास्त काही बोलणे टाळले.

Leave a Comment