पुणे, : चलनवाढीवर नियंत्रणाचे आव्हान असताना रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारतातील बँकांना व्यवसायासाठी अधिक निधी उपलब्ध व्हावा यासाठी केलेले उपाय स्तुत्य आहेत अशी प्रशंसा ऑस्ट्रेलियाच्या ल ट्रोब विद्यापीठाच्या बिझनेस , इकोनोमिक्स विषयाचे नामवंत प्राध्यापक आणि कार्यकारी अधिष्ठाता ले ड्रेक यांनी केली आहे.
ल ट्रोब विद्यापीठाने भारतीय विद्यार्थ्यांसाठी अडीच लाख डॉलर रकमेची शिष्यवृत्ती आणि नवे व्यावसायिक अभ्यासक्रम जाहीर केले. त्यावेळी खास मुलाखत देताना प्रा . ड्रेक म्हणाले की रघुराम राजन यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर व्याज दर वाढविले असले तरी चलनवाढ आटोक्यात आण्यास ते आवश्यक होते. असे असताना हि त्यांनी बँकांना नियमात काही सवलती देऊन स्थिती सुधारली. रुपयाचे विनिमय मूल्यही डॉलरला ६ ८ वरून ६ १ पर्यंत सावरले आहे. रिझर्व्ह बँकेच्या नव्या नेतृत्वावर हा एक प्रकारचा विश्वास आहे .
अमेरिका , युरोपातील सध्याची स्थिती आव्हानात्मक आहे. मंदीमुळे रोजगार वाढीची आव्हाने आहेत . अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह ने रोखे खरेदी चालू ठेवली असली तरी स्थिती सुधारण्यास बराच काल लागेल . त्या तुलनेत भारताच्या ‘ग्रोथ’ स्टोरीवर असलेला पाश्चिमात्य देशांचा विश्वास कमी झालेला नाही. आमच्यासारखे विद्यापीठ येथे येण्यामागे हेच कारण आहे. म्हणून आम्ही व्यवसाय प्रशासन क्षेत्रातील पारंपरिक अभ्यासक्रमासोबत क्रीडा क्षेत्राशी संबंधित व्यवस्थापन अभ्यासक्रम येथे उपलब्ध करून देणार आहोत .
भारतात क्रीडा व्यवस्थापन क्षेत्रात मोठा वाव आहे . क्रिकेट, फुटबॉल सारख्या खेळात असलेला पैसा हे त्यामागचे कारण आहे. आम्ही त्यासाठी येथील क्रीडा व्यवस्थापन सेवा कंपन्यांशी बोलणी सुरु आहेत अशी माहिती देऊन ते म्हणाले की आमच्या विद्यापीठात ऑस्ट्रेलियात क्रीडा व्यवस्थापन अभ्यासक्रम केल्यास मेलबोर्न क्रिकेट क्लबसारख्या नामांकित संस्थात अन परदेशातील क्रीडा स्पर्धा आयोजनाचा अनुभव मिळतो.
ल ट्रोब विद्यापीठाने येथील एम आय टी संस्थेशी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी करार केला आहे.