एसएमएससे होती है निंद हराम

वॉशिंग्टन – मोबाईलधारी विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर मोबाईल फोनचे कोणकोणते गंभीर परिणाम होतात याबाबत बरीच चर्चा आणि संशोधने सुरू आहेत. परंतु त्या संशोधनांमध्ये मोबाईलचे सर्किट, मोबाईलमधून बाहेर पडणारी किरणे किंवा निरनिराळ्या प्रकारची उत्सर्जने यांचा मेंदूवर काय परिणाम होतो याचा अधिक विचार केला जात होता. परंतु आता एसएमएसचा काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यात आला असून अनावश्यक एसएमएस टाईप करत बसल्यामुळे झोपेवर परिणाम होतो, असे आढळून आले आहे.

संशोधकांनी असे दाखवून दिले आहे की, अनावश्यकपणे आणि सातत्याने एसएमएस पाठविणार्‍या विद्यार्थ्यांना निद्रानाशाचा विकार जडू शकतो. महाविद्यालयात जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या झोपेच्या सवयी, भावनिक आंदोलने आणि त्याचे पोटावर होणारे परिणाम यांच्या अनुषंगाने या विद्यार्थ्यांचे इतरांशी असलेले संबंध, वागणूक आणि मेसेज टाईप करण्याची सवय यांचा अभ्यास केला गेला.

अमेरिकेतल्या ली युनिव्हर्सिटीतील कार्ला मर्डोक यांनी या विषयावर संशोधन केले आहे. या मुलांच्या झोपेवर त्यांच्या इतरांशी असलेल्या संबंधांचा परिणाम होत असतो, असे बर्‍याच दिवसांपासून दिसून आले होते. परंतु हे संबंध कोणकोणत्या मार्गाने व्यक्त होत असतात याचा सविस्तर अभ्यास केला असता त्यात एसएमएस या माध्यमाने अधिक परिणाम होतात आणि झोपेवर गंभीर परिणाम होतो असे दिसून आले.

Leave a Comment