संगीताने मेंदू तरुण राहतो

मेलबर्न – माणसाला वृद्धत्व यायला लागले की, त्याच्या मेंदूची शक्ती कमी होते आणि त्यातून काही आजार उद्भवतात. परंतु शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, मेंदूचे हे विकार आणि क्षीण होणे हे संगीतामुळे टळू शकते. एक किंवा त्यापेक्षा अधिक वाद्ये वापरणार्‍या आणि वाजवणार्‍या व्यक्तीला वृद्धत्वामुळे येणारे हे मांद्य कमी होऊ शकते. सेंट अँड्र्यूज विद्यापीठातल्या संशोधकांनी याबाबत संशोधन केले आहे.

मानसशास्त्रज्ञांच्या मते संगीतकार हा उच्च दर्जाच्या बुद्धीमत्तेचा असतो. व्यंगचित्रकार, संगीतकार, सेनापती आणि पत्रकार हे या कोटीत मोडतात. तसा संगीतकार केवळ बुद्धीमान असतो असे नाही तर आपल्या सभोवताली घडणार्‍या घटनांतील सुसंगती आणि विसंगती यातला फरक त्याच्या बुद्धीला अन्य सामान्य लोकांपेक्षा लवकर कळतात.

या गुणधर्मामुळे संगीतकार आपल्या परिसरातील चांगल्या गोष्टी आत्मसात करतो आणि तितक्याच तत्परतेने वाईट गोष्टींचा त्याग करू शकतो. या अभ्यासाचे निष्कर्ष न्यूरोसायकॉलॉजिया या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही