कॅटरिना देतेय रणबीरऐवजी हृतिकला पसंती

कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर यांचे प्रेमप्रकरण सध्या जोरात सुरू असले तरी आजकाल ती रणबीरला जास्त भाव देत नाही. रणबीरऐवजी कॅटरिनाची हृतिक रोशनला जास्त पसंती मिळत आहे. कॅटरिनाला हृतिकला का महत्त्व देत आहे, असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असेल, पण हा मामला वैयक्तिक नाही, चित्रणाच्या तारखांचा आहे.

काही दिवसांपूर्वी हृतिकच्या मेंदूवर अचानक शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्या वेळी तो बँगबँग चित्रपटाचे चित्रण करीत होता. मात्र अचानक उद्भवलेल्या या समस्येमुळे त्याला चित्रपण थांबवावे लागले होते. बँगबँगचे चित्रण रखडल्यामुळे त्याची सहकलाकार कॅटरिनाने आपली व्यावसायिक व खासगी कामे उरकून घेतली. या कालावधीत तिने ब्रिटनमध्ये आपल्या बहिणीच्या विवाहाच्या खरेदीपासून अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली.

एवढेच नाही तर व्यावसायिक पातळीवरही तिने दोन चित्रपट स्वीकारले. एक दिग्दर्शक अभिषेक कपूरसोबत आहे, तर दुसरा अनुराग बासूचा ‘जग्गा जासूस’. अभिषेकच्या चित्रपटात सुशांत सिंह राजपूत तिचा नायक असून ‘जग्गा जासूस’मध्ये रणबीरसोबत ती पुन्हा पडद्यावर दिसणार आहे. आता असे समजते की, रणबीर नायक असलेल्या ‘जग्गा साजूस’ चित्रपटाला ती जास्त तारखा देत आहे आणि हृतिकच्या बँगबँगला कमी.

बँगबँगचे ८0 टक्के चित्रीकरण आटोपले असल्याने हा चित्रपट वेळेत पूर्ण करण्यासाठी हृतिकची धडपड सुरू आहे. कॅटरिनाने हा चित्रपट स्वीकारला खरा, पण आता त्यासाठी तारखा देण्याची वेळ आल्यावर तिची गोची झाली आहे. अर्थात, तिचा मॅनेजर या समस्येतून मार्ग शोधण्याचा प्रय▪करीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कॅटरिना नोव्हेंबरमध्ये ‘जग्गा जासूस’चे चित्रण सुरू करणार आहे. दुसरीकडे ती १५ नोव्हेंबरपासून बँगबँगच्या चित्रणासाठी उपलब्ध असेल, असे हृतिक सागंतो. ही कसरत कॅतरिनाला कशी जमेल, शंकाच आहे. हे दोन्ही चित्रपट २0१४ मध्ये प्रदर्शित होत असल्याने कॅटरिना ‘जग्गा जासूस’ऐवजी हृतिकच्या बँगबँगला जात महत्त्व देत आहे.

Leave a Comment