हाताच्या घामानेही लागते आत्महत्येचे विचारांची चाहूल

मुंबई – निराशेच्या आहारी गेलेली व्यक्ती आत्महत्या करू शकते का? हे आता त्या व्यक्तीच्या हाताला सुटणार्‍या घामावरूनही कळू शकणार आहे. शास्त्रज्ञांनी तशी टेस्ट शोधून काढली आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत असतील तर त्याबद्दल अगोदरपासून दुसर्‍या व्यक्ती अंदाज घेऊ शकतात आणि अशा व्यक्तींना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करता येऊ शकणार आहे.

एखादी व्यक्ती निराश असेल, हताश असेल तर तो केव्हा टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपवेल हे सांगणे मानसोपचार तज्ज्ञांनाही कठिण ठरते. पण, अशाच काही लोकांचा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी ही नवीन पद्धत शोधून काढली आहे. ही चाचणीद्वारे मिळणारा निकाल हा जवळजवळ 97 टक्के योग्य असेल. जर्मन आणि स्वीडीश शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या या नवीन पद्धतीत केवळ रक्तदाब, रक्ताभिसरण आणि धर्मग्रंथी म्हणजेच घामाच्या प्रमाणांवरून व्यक्तीच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत असतील तर लगेचच समजू शकेल.

आत्महत्या करण्याच्या विचारात असलेल्या व्यक्तीच्या मनातील भाव ओळखून लगेचच सिग्नल कार्यरत होऊन त्यातून आवाज सुरू होईल, असे स्वीडनच्या लिंकोपींग युनिव्हर्सिटीच्या प्रयोगिक मानसशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक लार्स हाकन थोरेल यांनी म्हटले आहे. जर्मनीमध्ये 783 नैराश्याने ग्रासलेल्या व्यक्तींवर हा प्रयोग करण्यात आला. वेगवेगळ्या परिस्थितीत रुग्णांवर चाचाण्या केल्यानंतर आत्महत्या करण्याच्या विचारात असलेल्या रुग्णांनी इतर रुग्णांपेक्षा पर्यावरणीय बदलास अधिक वेगाने प्रतिसाद दिला. हायपर अ‍ॅक्टिव्हिटी आढळलेल्या 97 टक्के नैराश्याग्रस्त रुग्णांनी नंतर आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. केवळ दोन टक्के पेशंट हायपर अ‍ॅक्टिव्ह आढळले नसल्याचे संशोधनात उघड झाले आहे