गोंदण म्हणजे कर्करोगाला निमंत्रण

मेलबोर्न – सध्याच्या तरुण पिढीमध्ये हातावर आणि शरीराच्या विविध अवयवांवर गोंदवून घेण्याची फॅशन वाढत चालली आहे. भारतामध्ये पूर्वीच्या काळी गोंदणाची पद्धत होती आणि अजूनही खेड्यापाड्यांमध्ये गोंदणाची प्रथा रूढ आहे. परंतु परंपरागत भारतीय गोंदणामध्ये वनस्पतींपासून तयार केलेली शाई वापरली जाते. सध्याच्या काळातील आधुनिक गोंदणामध्ये मात्र कृत्रिम शाई वापरली जात असल्यामुळे हे गोंदण आरोग्याला घातक ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

ऑस्ट्रेलियातील एका इंग्रजी दैनिकामध्ये हा इशारा प्रसिद्ध करण्यात आला आहे. गोंदणासाठी वापरली जाणारी शाई आपल्या शरीराच्या आत झिरपू शकते आणि तिच्यामुळे कर्करोग होऊ शकतो, असे या तज्ज्ञांनी बजावले आहे. गोंदणाची ही शाई आत झिरपून रक्तात मिसळते. रक्त सर्व अवयवांना दिले जाते. त्यामुळे रक्ताच्या माध्यमातून ही शाई सर्व अवयवांपर्यंत पोहोचते आणि कोणत्याही अवयवाचा कर्करोग होण्याची शक्यता असते.

हा धोका ओळखून आता गोंदणाच्या बाबतीत काही निर्बंध लागू करण्याचा आग्रह तज्ज्ञ मंडळींनी धरला आहे. गोंदणासाठी कोणती शाई वापरावी, त्याचे घटक काय असावेत याबाबत काही नियम करण्याची गरज असल्याचे काही तज्ज्ञांनी म्हटले आहे. गोंदणाच्या शाईतील काही घटक विषारी आणि जीवघेणे असल्याचे या तज्ज्ञांचे मत आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment