अक्षयने केली बॉससाठी डॅनीची निवड

आगामी काळात येत असलेल्या ‘बॉस’ या सिनेमासाठी अभिनेता अक्षय कुमारने बिग बॉसच्या भूमिकेसाठी डॅनीची निवड केली आहे. त्याअमुळे आता या सिनेमात अक्षय सोबत डॅनी म्हणून काम करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून डॅनी निवडक हिंदी सिनेमातून काम करताना दिसत आहे. या सिनेमातून काम करण्यापस डॅनीने होकार दर्शविला आहे.

गेल्यास काही दिवसांपासून हिंदी सिनेमातून जुन्याजाणत्या अभिनेत्यांना पुन्हा एकवार चरित्र व्यक्तिरेखांसाठी मागणी वाढू लागली आहे. विनोद खन्ना, मिथून चक्रवर्ती हे दोघेही सध्या हिंदी सिनेमामधून वेगवेगळ्या नायकांबरोबर विविध चरित्र व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहेत. यात आता डॅनी डॅंग्झोपा या अभिनेत्याचीही भर पडली आहे. डॅनी सध्या फार निवडक हिंदी चित्रपटांमधून काम करताना दिसतात. इम्रान खानबरोबर लक सिनेमात काम केल्यानंतर डॅनीने कुठलाही हिंदी सिनेमा केला नव्हता.

याआधी अक्षयच्या ‘चांदनी चौक टु चायना’मध्ये अक्षयने मिथुन चक्रवर्तीबरोबर जोडी जमवली होती. त्यानंतर ‘पतियाला हाऊस’साठी ऋषी कपूर आणि आता ‘बॉस’साठी त्याने डॅनीबरोबर जोडी जमवली आहे. सिनेमाच्या नावाप्रमाणे अक्षय त्यात ‘बॉस’ आहे हे उघड आहे. पण, त्याच्याही वरचा बॉस किंवा मार्गदर्शक म्हणून एखादा ताकदीचा अभिनेता अक्षय कुमारला हवा होता. म्हणून त्याने या ‘बिग बॉस’साठी डॅनीची निवड केली. डॅनी यात बिग बॉसच्या भूमिकेत असले तरी त्यांची भूमिका खलनायकी नाही, असे समजते.