कुस्तीपटू संदीप तुलसीचे जोरदार स्वाषगत

मुंबई – ग्रीको रोमन प्रकारात पदक जिंकणारा भारताचा सीनियर कुस्ती कुस्तीपटू संदीप तुलसी यादवचे मायदेशात जंगी स्वागत करण्यात आले. नवी दिल्लीपासून मुंबई विमानतळ अन् साई केंद्र असा त्याचा प्रवास जोरदार ठरला.

मुंबई विमानतळावर त्याच्या स्वागतासाठी शेकडो क्रीडाप्रेमी वाट पाहत होते. यानंतर पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कारही करण्यात आला. कांदिवलीतील साई येथेही मिठाई वाटण्यात आली. विविध गाण्यांवर त्याच्या सहकार्यांनी बेधुंदपणे नृत्यही केले. रजबीर चिकारा आणि नवीन यांना स्पर्धेतून बाद व्हावे लागल्यानंतर संदीपने कास्य पदक पटकावून भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले

संदीपने ग्रीको रोमनमध्ये पदक जिंकून दाखवल्यानंतर त्याचे प्रशिक्षक जगमालसिंग यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. कुस्तीमध्ये यश मिळत नाही हे पाहून तो ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत होता, पण प्रशिक्षकांच्या सांगण्यावरून तो या स्पर्धेला गेला आणि इतिहास घडवला. त्या्चे मायदेशात जंगी स्वागत करण्यात आले.

Leave a Comment