खास मोरांसाठी एक अभयारण्य

बहुतेक अभयारण्याच्या ठिकाणी स्थानिक नागरिक आणि वनविभाग यांच्यात कधी विळ्या भोपळ्याचे नाते असते. बहुतेक ठिकाणी किमान विसंवाद तरी असतोच. मात्र बीड जिल्ह्यातील नायगाव या गावाच्या परिसरात खास मोरांसाठी एक अभयारण्य आहे आणि स्थानिक नागरिकही त्या वाणाची आणि त्यातील मोरांची मनापासून जपणूक, संगोपन आणि संवर्धन करतात.
  Peacock    

बीड जिल्ह्यात सुमारे २९.९० चौरस कि.मी. क्षेत्रात खास मोरण्साठीएचे हे अभयारण्य वसलेले आहे. या ठिकाणच्या इतिहासात स्थानिकांच्या या अभयारण्य आणि मोरांबद्दलच्या आस्थेचे रहस्य दडले आहे. सुमारे शंभर वर्षापूर्वी या ठिकाणी माथेरसाहेब देव नावाचे एक संत पुरुष होउन गेले. त्यांना मोरांविषयी आत्यंतिक प्रेम होते. त्यांच्या झोपडीवजा आश्रमाच्या आजूबाजूला अनेक मोरांचे वास्तव्य होते. देवा साहेबांनी त्यांची केलेली निगराणी आणि त्यांना दिलेले प्रेम यामुळे निर्भयपणे राहणार्या मोरांची संख्याही वाढली. देव साहेबांचे हे मयूर प्रेम हळू हळू त्यांच्या शिष्यांमध्ये आणि स्थानिक लोकांमध्येही निर्माण झाले आणि त्यातून मोरांसाठी एका सुरक्षित आणि अनुकूल अवसाची निर्मिती झाली.
Peacock1

अनेकदा या मोरांकडून अनाहूतपणे अन्नासाठी आजूबाजूच्या शेतातील पिकांचे नुकसान होत असे. मात्र स्थानिक नागरिकांनी मोरांना जगविणे हे आपले कर्तव्य असल्याचे मानल्याने या नुकसानाचा त्यांनी फारसा विचार केला नाही. अनेक वर्ष वनविभागाने मोरांमुळे होणार्या शेतीच्या नुकसानीची भरपाई देण्याची तयारी ठेवली होती. मात्र स्थानिकांमध्ये मोरांबाद्द्ल प्रेम आणि आस्था असल्याने ही नुकसान भरपाई घेण्यास फारसे कोणी पुढे आले नाही. आजही स्थानिकांमध्ये मोरांबद्दलचे प्रेम कायम आहे.
    

सन १९९५ मध्ये वनविभागाने या परिसराची संरक्षित मयूर अभयारण्य म्हणून घोषणा केली. या ठिकाणी सुमारे ३ हजार मोरांचे वास्तव्य आहे. मात्र गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी मोरांची संख्या कमी होत असल्याचे प्रगणनेच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. स्थानिक नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग असला आणि शिकारीचे प्रमाण अत्यल्प असले तरीही या ठिकाणी घटत जाणार्या मोरांच्या संख्येचे प्रमुख कारण म्हणजे पाण्याचे दुर्भिक्ष! एकूण संपूर्ण बीड जिल्हा हा दुष्काळी म्हणूनच ओळखला जातो. रणरणीत  उन आणि पाण्याचा तुटवडा या भागात पाचवीलाच पुजलेला आहे. मोरांची ही त्यापासून सुटका नाही. वनविभागाने या क्षेत्रात मोरांसाठी पाण्याचे कृत्रिम तलाव उभारले आहेत. मात्र मुळात पाण्याचीच उपलब्धता नसल्याने हे उपाय तोकडे पडत आहेत. दुष्काळी परिस्थितीतही स्थानिक नागरिक मोरांना धान्य देऊन त्यांचे उदरभरण करण्याचा आटोकाट प्रयत्न  करतात. मात्र पाण्याचा तुटवडा दूर कारणे त्यांच्याही हातात नाही. त्यामुळे मोरांची नायगाव अभयारण्यातील संख्या वेगाने घटताना दिसून येत आहे.  

Leave a Comment