काँग्रेस कार्यकर्त्याची राहूल गांधीकडे राष्ट्रवादीशी मैत्रीपूर्ण लढतीची मांगणी

पुणे,ˆ‘ गेल्या काही वर्षात काँग्रेसने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत; त्यामुळे विरोधी पक्षाच्या लोकांनी कितीही अपप्रचार केला तरी आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी 2009 पेक्षा निश्‍चितच सरस होइल असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी पुणेयेथे काँग्रेस कार्यकत्यार्ंच्या मेळाव्यात बोलून दाखविले. . राज्यातील आपली ताकद वाढविल्यास सत्तास्थापनेसाठी इतर पक्षाची मदत घ्यावी लागणार नाही; त्यासाठी प्रयत्न करावेत असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी येथे प्रदेश काँग‘ेसच्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना सांगितले. बालेवाडी क‘ीडा संकुलात ही बैठक झाली त्यापूर्वी त्यांनी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण भागातील कार्यकर्त्यांच्या भेटून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यांच्या समवेत प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे व मु‘यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते त्याच प्रमाणे केंद्रातील महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश व सचीव शोराज वाल्मिकी होते. सकाळी दहा वाजता ते बालेवाडी क‘ीडा संकुलात आले व सायंकाळपयर्र्त त्यांच्या भेटीगाठी सुरु होत्या.

पुण्यातील या मेळाव्यात कोठेही सुरेश कलमाडी दिसले नाहीत पण तीन हजार कार्यकत्यार्ंची सारी व्यवस्था कलमाडींचे कार्यकर्ते बघत होते. गेल्या आठवड्यात कलमाडींच्या पुणे फेस्टिव्हला मु‘यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट दिली होती व त्यात त्यांनी कलमाडी यांचे कौतुकही केले होते त्यावरून आज बहुदा त्यांचे पक्षात स्वागत करण्याचे संकेत दिले जातील असे वाटले होते पण प्रत्यक्षात कलमाडी यांचा कसलाही उल्लेख झाला नाही.

सकाळी प्रथम ते पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्हा येथील कार्यकर्त्यांना भेटले. नंतर सांगली सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना भेटले. पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी ‘आपल्याला राष्ट्रवादीशी युती अजिबात नको, विरोधी बाकावर बसावे लागले तरी चालेल त्याच प्रमाणे ‘तर मग मैत्रीपूर्ण लढतच होवून जावू द्या, अशी मागणी जोरदार करण्यात आली. प्रथम त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला व नंतर मेळाव्याकडे रवाना झाले.

राहूल गांधी पुढे म्हणाले, दोन हजार चार व दोन हजार नऊसालामध्येही काँग‘ेसला असेच बहुमत मिळेल की नाही असेच वातावरण होते तरीही आपण गेली साडेनऊ वर्षे सत्तेवर आहोत, त्याच प्रमाणे पुढील वर्षी होणार्‍या लोकसभानिवडणुकीतही आपण निवडून येणार आहोत, खरा आणि काम करणारा कार्यकर्ता नेहमीच मागे राहातो आणि काम न करणारा कार्यकर्ता पुढे जातो; त्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय मिळत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करण्यात येणार असून या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी पक्षाच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. पक्षाच्या मजबूतीसाठी शिस्त सर्वात महत्वाची असून पक्षातील गटबाजी थांबवा असे आदेश देऊन राहूल गांधी म्हणाले; पक्षात काम करत असताना काही कार्यकर्त्यांकडून पक्षाला धोका निर्माण होइल असे निर्णय घेतले जातात अशा कार्यकर्त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करुन देऊन त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची गरज आहे.

आगामी निवडणुकांत स्वबळावर लढावे अशी मागणी बहुतांशी कार्यकर्त्यांनी केली; त्यांचा हा प्रस्ताव योग्य असला तरी त्यासाठी विरोधकांशी संघर्ष करण्याची ताकद आपल्यात निर्माण होण्याची गरज असून त्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत. असे झाले तर केंद्रात सत्ता स्थापन करताना आपल्याला इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार नाही, असे मतही राहूल गांधी यांनी व्यक्त केले.

कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा…
तळागाळातील कार्यकर्त्यांना ताकद आणि विश्‍वास देण्यासाठी राहूल गांधी यांनी आज त्यांच्याशी थेट संवाद साधला. हीच संधी साधत कार्यकर्त्यांनी आपले गार्‍हाणे त्यांच्यासमोर मांडले. भाजपा- शिवसेना युती हा पक्ष शत्रू वाटत असला तरी मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग‘ेसच आपला नंबर वनचा शत्रू आहे, राष्ट्रवादीने जिल्ह्यातून काँग‘ेस संपविण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे भविष्यातील धोका ओळखून या संकटाला सामोरे जाण्यासाठी आणि पक्षाची ताकद वाढविण्यासाठी स्वबळावर लढावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली.
गटबाजी आणि मतभेद मिटविल्यास सकारात्मक बाबी घडत असतात त्याचा पक्षाला आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही ’ायदा होत असतो, याची प्रचिती इतर राज्यात आली आहे. हा आदर्श सर्वांनी डोळयासमोर ठेवल्यास आपले उध्दिष्ठ निश्‍चितच पूर्ण होणार आहे, असेही त्यांनी बोलून दाखविले.
————————————————-

Leave a Comment