
नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआय आज आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांची आयपीएलमधून कायमची हकालपट्टी करण्याची शक्यता आहे. दिल्ली हायकोर्टाने बीसीसीआयला दिल्लीत विशेष सर्वसाधारण सभा घ्यायला परवानगी दिली आहे. 2008 – 10 या कालावधीत आयपीएल अध्यक्ष राहिलेल्या मोदी यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका बोर्डाने ठेवला होता. मोदींनी पतियाळा हाऊस कोर्टातून स्थगिती आदेश मिळविला होता पण दिल्ली हायकोर्टाने बीसीसीआयला अपेक्षित निकाल दिला आहे.