नवी दिल्ली: अॅटर्नी जनरल यांना सोनिया गांधींच्या नावाने बनावट फोन करणा-या महिलेचा पर्दाफाश झाला आहे. महिलेचे नाव अनिता गुप्ता असून ती भारत इलेक्ट्रिकल लिमिटेडमध्ये (बीएचएल) कामाला असल्याहची माहिती इंग्रजी वृत्तपत्रातून ही बातमी प्रसिद़ध करण्यात आली आहे.
या वृत्तानुसार अनिता गुप्ताने ५ सप्टेंबरला अॅटर्नी जनरल वाहनवटी यांना दोन वेळा फोन केला. पहिला फोन ५ सप्टेंबरला दुपारी केला, मात्र त्यावेळी वाहनवटी कार्यालयात नव्हते. त्यानंतर अनिताने संध्याकाळी साडे पाच वाजता दुस-यांदा फोन केला. या दरम्यान अॅटर्नी जनरल आणि महिलेमध्ये जवळपास तीन मिनिटे संभाषण झाले. मात्र वाहनवटी यांना संशय आल्याने त्यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली.
टाइम्सच्या वृत्तानुसार सीबीआय, गुप्तचर विभाग आणि दिल्ली पोलिस मास्टरमाईंडच्या शोधात आहेत. ज्यावेळी या महिलेने सोनिया गांधी बनून अटर्नी जनरल यांना फोन केला होता, त्यावेळी सोनिया गांधी अमेरिकेत वैद्यकीय उपचारासाठी गेल्या होत्या.