पुढील वर्षी तिसरी,चौथी आणि पाचवीचा अभ्यासक्रम बदलणार

scholपुणे, -पुस्तकातील ज्ञान व्यवहारिक विश्वाशी जोडण्याच्या योजनेचा भाग म्हणून पुढील वर्षात इयत्ता तिसरी, चौथी व पाचवीचे अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहेत. नव्या अभ्यासक्रमात बालकेंद्रित, उपक्रमाधिष्ठित आणि पुस्तकातील ज्ञान व्यवहारिक जीवनाशी जोडण्यात आला आहे, अशी माहिती राज्यशैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे सहसंचालक शकुंतला काळे यांनी दिली.

भूगोल, सामान्यविज्ञान व नागरिकशास्त्र हे विषयमिळून परिसर अभ्यास एक असा एकच पुस्तक राहणार आहे. त्याचप्रमाणे इतिहास विषयाचा समावेश परिसर दोनमध्ये करण्यात आला आहे. घोकंपट्टीना आता महत्त्व न राहता मुलांना पडणार्‍या सामान्यप्रश्‍नांची उकल कशा पद्धतीने होईल, यासाठी शिक्षकांची भूमिका ही मार्गदर्शकाची राहणार आहे. नवे अभ्यासक्रम निश्‍चितच विद्यार्थ्यांना शिकण्यास प्रोत्साहनपर राहणार असल्याचे काळे यांनी सांगितले.

Leave a Comment