लखनऊ – वयाच्या नव्वदीच्या उंबरठ्यावर पोहचलेले वयोवृद्ध नेते नारायण दत्त तिवारी आजकाल आपल्या विचित्र वागणुकीमुळे चर्चेत आहे. रविवारी लखनऊमध्ये शहीदांसाठी उदय भारत संस्थेतर्फे आयोजित एका कार्यक्रमात उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. मात्र, त्यांनी उधळलेल्या रंगामुळे उपस्थितांना आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला. तसेच यावेळी आयोजकांचीही चांगली धावपळ झाली.
एन.डी. तिवारींची ग्रँडमस्तीफ, महिलेसह डान्स जबरदस्ती
कार्यक्रमात शहिदांना देशभक्ती गीते, नाटक आणि नृत्याच्या माध्यमातून श्रद्धांजली देण्यात आली. या दरम्यान एन.डी. तिवारी व्यासपीठावर चढल आणि ङ्गकदम-कदम बढ़ाए जा खुशी के गीत गाए जा…ङ्घ हे देशभक्ति गीत गाऊ लागले. या वयस्कर नेत्याच्या वागणुकीमुळे उपस्थितांनी खूप टाळ्या वाजवल्या. त्यामुळे एन.डी. तिवारी खूपच उत्साहीत झाले आणि व्यासपीठावर चक्क नाचायला लागले.
नाचेपर्यंत ठिक होते. परंतु, त्या कार्यक्रमाच्या अडचणीची परिस्थिती तेव्हा निर्माण झाली जेव्हा कार्यक्रमाचे संचालन करणार्या एका महिलेला पकडून ते जबरदस्ती डान्स करायला लागले. आता टाळ्या वाजविणार्या प्रेक्षकांनी तिवारींची हुर्या उडवली. आयोजकांची यावेळी चांगली धावपळ उडाली. कसे-बसे जोशाफत आलेल्या तिवारींना आयोजकांनी आपल्या जागेवर बसवले. त्यानंतर मात्र बहुतांशी लोक हा विचित्र प्रकार पाहून निघून गेले.
