साखर कारखान्यांना मदत नाही: पवार

मुंबई – साखर कारखानदारांनी कामगारांचे पगार वेळेत द्यावेत, नाहीतर कारखान्यांना सरकार मदत करणार नाही असा सज्जड दम राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिला आहे. महाराष्ट्र सहकारी साखर संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते काल बोलत होते. साखर कारखानदारी टिकवायची असेल तर शहाणपणाने वागा, असा सल्लाही पवारांनी दिला.

पवारांनी साखर कारखानदाराच्या चूकावर बोट ठेवत आता यापुढे सरकार आणि बँका यांनी कारखानदारांच्या मदतीसाठी पुढे यायचं की नाही याचा विचार करावा लागेल, असंही त्यांनी नमूद केलं. मुंबईमध्ये आयोजित सभेला भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडेही उपस्थित होते.

Leave a Comment