’विदेशी महिलेच्या सांगण्यावरून माझी चौकशी’- रामदेव

लंडन – लंडनमध्ये झालेली चौकशी विदेशी महिलेच्या सांगण्यावरून झाली असं म्हणत योगगुरु रामदेव बाबांनी सोनिया गांधींवर निशाणा साधला. लंडनमध्ये आयोजित योग शिबीरात रामदेव बाबा बोलत होते. लंडनमध्ये गेल्यावर रामदेव बाबांची हिथ्रो विमानतळावर दोन वेळा चौकशी झाली. ही चौकशी विदेशी महिलेच्या सांगण्यावरूनच झाल्याचा आरोप त्यांनी केला. रामदेव बाबांची चौकशी झाल्यानंतर कालही त्यांनी केंद्र सरकारच्या सांगण्यावरूनच चौकशी केल्याचा आरोप केला होता. आज तर रामदेव बाबांनी थेट सोनिया गांधींवर शरसंधान साधलं आहे. स्वामी विवेकानंदांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी रामदेव बाबा सध्या लंडनमध्ये आहेत.