
‘माझ्या मुलांनी देखील बिग बॉस मधील इतके आक्षपार्ह विषय बघावे असं मला वाटत नाही’, मुंबईच्या एका लोकप्रिय वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सलमान खानने असं मत व्यक्त केलं. शो दरम्यान स्पर्धकांच्या भानगडींमध्ये वाहत जाण्याबद्दल देखील सलमाननं नापसंती दर्शविली. “बिग बॉसच्या घरातलं स्पर्धकांचं वागणं मला अजिबात रुचत नाही. घरामधील आबालवृद्ध हा कार्यक्रम पाहात असतात. जर मी पालक असतो, तर माझ्या मुलांना इतका आक्षपार्ह शो मी पाहू दिला नसता. एका घरात वास्तव्य असताना काही प्रसंगी स्पर्धकांमध्ये होणारे भांडणं मी समजू शकतो.
