‘ माकडाच लगीन’ या चित्रपटाचे म्युझीक लाँच

नाटकाचे चित्रपटात माध्यमांतर करण्याचा सध्या मराठी इंडष्ट्रीत टृएंड रूजू पहात आहे. यात आता भर पडली आहे अनेक पुरस्कार विजेते ‘माकडाचे लगीन’ या नाटकाची. मैत्रेय एन्टरटेन्मेंटची प्रस्तुत अन् अल्ताफ पिरजादे व संतोष निबुदे निर्मित माकडच लगीन’ या चित्रपटाच्या ध्वनीफितेचे प्रकाशन कसबा गणपती येथे नुकतेच पुण्याच्या महापौर चंचला कोद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी चित्रपटाची संपूर्ण टीम या वेळी आवर्जून होती. या चित्रपटात 3 गीते आहेत. गीतांना संगीत समीर खंडागळे यांचे आहे. मराठीत पहिल्यांदाच अभंग आणि लावणीची जुगलबंदी आपणास पाहवयास व ऐकण्यास मिळेल. चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन प्रशांत सुर्वे यांचे असून कला दिग्दर्शन उमेश आधातराव यांचे तर छायाचित्रण तुषार विभूते यांचे आहे. या चित्रपटात सुरेखा कुडची, संस्कृती बालगुडे, नम्रता आवटे, चेतन दळवी, विकास समुंद्रे, सुनील गोडबोले आदी कलाकार माकडाच लगीन मध्ये आहेत.

Leave a Comment