चेन्नई सुपर किंग्सची विजयी सलामी

रांची: चॅम्पियन्स लीग स्पर्धेमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने विजयी सलामी दिली आहे. चेन्नईने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात दमदार खेळी करताना टायटन्सचा सहा विकेट्स राखून पराभव केला. या विजयामुळे चेन्नई सुपर किंग्सचे मनोबल उंचावले आहे. त्यामुळे आता चेन्नईच्या पुढील सामन्याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टायटन्स टीमने चेन्नई सुपर किंग्ससमोर विजयासाठी १८६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मायकल हसी, सुरेश रैना आणि ड्वेन ब्राव्होच्या खेळींच्या जोरावर चेन्नईने त्या लक्ष्याचा सहज पाठलाग केला. हसी आणि रैनाने प्रत्येकी ४७ धावा केल्या तर ब्राव्होने ३८ धावांची खेळी केली. या तिघांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर टायटन्सटने हा सामना सहा गडी राखून जिंकला.

तत्पूर्वी टायटन्सनी प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १८५ धावांपर्यंत मजल मारली. टायटन्सकडून एबी डिव्हिलियर्सने ७७ तर हेन्री डेव्हिड्सने २० धावांची खेळी केली. बाकी फलंदाज मात्र अपयशी ठरले. त्यामुळे त्याना मोठी धावसंख्‍या उभारता आली नाही.

Leave a Comment