सचिनचा २०० वा कसोटी सामना पाहण्याची इच्छा-लारा

नवी दिल्ली – आगामी काळात टीम इंडिया आणि वेस्ट इंडीज यांच्यामध्ये कसोटी मालिका होत आहे. नोव्हेंबर महिन्यात होणारी कसोटी मालिका ही सचिन तेंडुलकरच्या कारकीर्दीची अखेरची असणार आहे अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. त्यालमुळेच वेस्ट इंडीजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लारानेही मास्टर ब्लास्टरचा २००वा कसोटी सामना स्टेडियममध्ये बसून बघण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

बीसीसीआयने सचिनचा २०० वा कसोटी सामना कुठे आयोजित करावा याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेतला असला तरी हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडेल अशी दाट शक्यता आहे. याबाबत विंडीजचा महान फलंदाज ब्रायन लाराने ‘ट्विटर’वर आपले मत व्यक्त करताना म्हटले, सचिनच्या २०० व्या कसोटी सामन्याचे स्थळ व तारखांबाबत मला कोणीतरी सांगावे. तेथे उपस्थित राहण्यासाठी उत्सुक आहे.

दरम्यान, सध्या तो भारतामध्ये् सुरू असलेल्या चॅम्पियन्स लीग स्परर्धेसाठी येथे आले आहे. सध्या तो चॅम्पियन्स लीग स्पार्धेतील क्रिकेटचा आनंद ख-या अर्थाने घेतो आहे.