ब्रिटीश अभ्यासक्रम पुण्यात शिकवले जाणार

accaपुणे – बहुराष्ट्रीय उद्योगांना लेखा विषयक बदलत्या नियमांची माहिती दे ऊन त्यांचे हिशोब अचूक ठेवणारे मनुष्यबळ सध्या भारतात कमी असल्याने जागतिक दर्जाच्या ए सी सी ए ( असोसिएशन ऑफ चार्टर्ड सर्टिफाईड अकौंटन्ट ) संस्थेने पुण्यातील नेस वाडिया आणि सिम्बायोसिस कला आणि वाणिज्य या महाविद्यालयांशी करार करून द्विलक्ष्यी अभ्यासक्रम सुरु करण्याचे ठरविले आहे अशी माहिती ए सी सी ए च्या भारताच्या व्यवस्थापक इलहाम पंजांनी यांनी आज येथे निवडक पत्रकारांना दिली.

भारतात ज्या ज्या ठिकाणी कौन्सिल ग्रंथालय आहे तिथे हा अभ्यासक्रम भविष्यात सुरु केला जाणार आहे असे नमूद करुन त्या म्हणाल्या कि सध्या पौंड १ ० ० रुपया झाल्याने हा अभ्यासक्रम ब्रिटन मध्ये करणे आणि त्यासाठी शिक्षण कर्ज का ढणे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलेले आहे . तेच प्रमाण पत्र आणि बी एससी ही ऑक्सफोर्ड ब्रुक्स विद्यापीठाचा पदवी अभ्यासक्रम येथे केल्यास खर्चात ५ ० ० टक्के बचत होणार आहे.

भारतात लेखापरीक्षण कामाचे परदेशी कंपन्या मोठ्या प्रमाणात आउटसोर्सिंग करत असल्याने जागतिक वित्तीय निकष पाळणारे (आय एफ आर एस ) अभ्यासक्रम शिकून तयार झालेले मनुष्यबळ हवे आहे .

के पी एम जी, देलोय , अर्न्स्ट -यंग या सारख्या मोठ्या लेखापरीक्षण कंपन्यांना त्यांची गरज भासते. ती यामुळे पूर्ण होणार आहे. बी पी ओ कंपन्यांना असे लोक लागतात. नेस वाडिया आणि सिम्बायोसिस संस्थात अभ्यासक्रम केल्यास नोकरीसाठी मुलाखतीला बोलवले जाण्याची हमी मिळते.

विद्यार्थी या प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अभ्यास करू शकतात त्यामुळे नोकरी करूनही तो करता येणार आहे अशी माहिती देऊन त्या म्हणाल्या की देशात आम्ही सात शहरात याचे केंद्र सुरु केले आहे . त्यात मुंबईचा समावेश आहे. २ ० १ ५ पर्यंत भारतात आंतरराष्ट्रीय वित्तीय निकष असलेले लेखापरीक्षण नियम येणार असल्याने असे प्रमाणपत्र असलेल्या मनुष्यबळाची गरज वाढणार आहे. आम्ही देत असलेले प्रमाणपत्र जागतिक दर्जाचे असल्याने उमेदवाराला परदेशात प्लेसमेंट मिळू शकते.

नेस वाडिया चे प्राचार्य एम . एम अंदार आणि सिम्बायोसिस चे प्राचार्य ऋषिकेश सोमण यांनी या करारा चे स्वागत केले आहे