इस्रायल इराणच्या मारक क्षमतेच्या टप्प्यात

तेहरान – दोन हजार किमीचा पल्ला असलेली 30 क्षेपणास्त्रे इराणने रविवारी आपल्या वार्षिक संचलनदिनी समाविष्ट केल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. इराणच्या आण्विक कार्यक्रमावरून इस्रायल व पाश्चिमात्त्य देशांबरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पाश्वभूमीवर इराणच्या भात्यामधील ही क्षेपणास्त्रे अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहेत. यामुळे इस्रायलमधील महत्त्वाची शहरे इराणच्या मारक क्षमतेच्या टप्प्यात आल्याचे मानले जात आहे.

इराण – इराक यांच्यामधील युद्धाचा दिवस इराणमध्ये युद्धसंचलनदिन म्हणून साजरा केला जातो. आज झालेल्या या संचलनदिनी 12 सेजिल व 18 घद्र क्षेपणास्त्रे इराणच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. इस्राईलसह आखाती देशांमधील अमेरिकेचे तळही यामुळे इराणच्या टप्प्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

इराणच्या आण्विक कार्यक्रमास इस्रायलने जोरदार विरोध दर्शविला आहे. आता इराणच्या या नव्या क्षेपणास्त्र प्रणालीच्या पाश्वभूमीवर पश्चिम आशियामधील तणावग्रस्त परिस्थितीत भर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Leave a Comment