बॉलीवुडचा रॉकस्टार रणबीर कपूरला भारताप्रमाणेच लंडन खूप आवडते. त्यामुळेच त्याला लंडनमध्ये राहिल्यानंतर त्याला भारतात राहिल्यासारखेच वाटते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता रणबीर कपूर आगामी काळात येत असलेल्या त्याच्या ‘बेशर्म’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी लंडनमध्ये आला आहे. याठिकाणी आल्यानंतर रणबीरला त्याच्या दुस-या घरात आल्यासारखे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत अधिक बोलताना अभिनेता रणबीर कपूर म्हणाला, ‘मी याठिकाणी लहानपाणपासून नेहमी येतो. तसे पाहिले तर बॉलिवूडच्या सिनेमासाठी लंडनमध्ये मोठे मार्केट आहे. त्यामुळे याठिकाणी सिनेमाच्या कामानिमित्त येणे मला नेहमीच आवडते. त्यामुळे मला या ठिकाणी माझे दुस-या घर असल्यासारखे वाटते.’
अभिनव कश्यपच्या दिग़र्शनाखाली तयार झालेल्या ‘बेशर्म’ या सिनेमात रणबीर सोबत त्याचे आई-वडिल ऋषि कपूर आणि नीतू सिंह काम करीत आहेत. या सिनेमात रणबीर कपूरने एका चोराची भूमिका केली आहे.’बेशर्म’ या सिनेमात रणबीर कपूर, ऋषि कपूर आणि नीतू सिंह सोबतच अभिनेत्री म्हणून पल्लवी शारदा आणि शक्ति कपूर यांनी मुख्य भूमिका केली आहे. हा सिनेमा मध्ये जावेद जाफरीने नेगेटिव भूमिका केली आहे. हा सिनेमा २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.