आम्लपित्तावर सोपे उपाय

acidity
लंडन – खाल्लेले अन्न पचन होण्यासाठी जठरामध्ये आम्लाची गरज असते परंतु ते आवश्यकतेपेक्षा जास्त पाझरले की धोकादायक ठरते असे आहारतज्ञांचे मत आहे. अशा प्रकारे ज्यादा आम्ल पाझरणे हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते आणि त्यावर अनेक प्रकारचे उपायही योजावे लागतात. परंतु मसालेदार पदार्थ खाण्याचा मोह टाळणे हा सर्वात प्रभावी इलाज असतो असे अनेक तज्ञांनी सांगितले आहे.

गीता सिध्दू या आहारतज्ञ महिलेने जठरातील आम्लाचे प्रमाण मर्यादित ठेवण्याचा उपाय शोधला आहे. त्यांनी आम्लपित्ताने त्रस्त असणार्‍या लोकांना शक्य तो कच्चे अन्न खाण्याचा सल्ला दिला आहे आणि त्या रॉ फूड स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नॉश डिटॉक्स हे विशिष्ट अन्न पदार्थ शोधून काढले असून या अन्नपदार्थामध्ये जठरातील ज्यादा आम्लातील विषारी अंश कमी करण्याची क्षमता असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आम्लपित्त कमी होण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत.

दिवसभरातला आहार विभागून चार-पाच भागात खाणे, रात्री उशिरा जेवण करणे टाळणे असे काही उपाय त्या सांगतात. रात्री झोपताना थोडीसी उंच उशी घेऊन झोपावे. वजन कमी करण्याचा प्रयत्न करावा. ऍस्परिनयुक्त औषधे घेण्याचे टाळावे. धूम्रपान करू नये. इत्यादी काही पथ्ये पाळल्यास आम्लपित्ताचे त्रास कमी होतात असा त्यांचा दावा आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

1 thought on “आम्लपित्तावर सोपे उपाय”

  1. अनिल नानाभाऊ पाटील

    अँसिडीटी वरचे उपाय खुप छान आहेत
    mo -9637691260

Leave a Comment