जयपूर- चॅम्पियन्स लीग टी-२०च्या क्रिकेट स्पर्धेतील सुरूवातीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सला सलामीलाच पराभवाचा धक्का दिला. राजस्थान रॉयल्सच्या विक्रमजीत मलिकच्या धारदार गोलंदाजीमुळे तर संजू सॅमसनच्या हाफ दमदार फलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्सला विजय मिळवीता आला.
चॅम्पियन्स लीगमध्ये राजस्थानची दमदार सुरूवात
पावसामुळे आउटफील्ड ओली असल्याकारणाने मॅच १५ मिनीटे उशीरा सुरू झाली. द्रविडने टॉस जिंकून पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि राजस्थान रॉयल्सच्या बॉलर्सनंही हा निर्णय योग्य ठरवला. सुरूवातीला फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सची सुरवात खराब होती. विक्रमजित मलिक या नवख्या गोलंदाजाने स्मिथ आणि कार्तिक यांना आऊट करून मुंबईची दोन बाद २६ अशी अवस्था केली होती. त्यानंतर तेंडुलकर आणि रायुडू बाद झाल्यावर मुंबईची अवस्था चार बाद ४३ अशी झाली होती. कर्णधार रोहित शर्मा आणि पोलार्ड यांनी उत्तुंग टोलेबाजी करून धावांचीही गती वाढविली, परंतु अंतिम टप्प्यात हे दोन्ही फलंदाज बाद झाले त्याउमुळे त्यांहना १४२ धावांपर्यंत मजल मारता आली.
रोहित शर्मा आणि केरॉन पोलार्ड यांच्या आक्रमक बॅटिंगनंतरही मुंबईला १४२ रन्सवर रोखणा-या राजस्थानने हे आव्हान दोन बॉल शिल्लक राखून पार केले. कप्तान द्रविड अपयशी ठरल्यानंतर सॅमसननं ५४ रन्सची वेगवान खेळी करून अजिंक्य रहाणेसह टीमला विजयी पथावर ठेवले. विजय आवाक्यात आलेला असताना सॅमसन बाद झाला; पण शेन वॉटसन आणि स्टुअर्ट बिन्नी यांनी मोहिम फत्ते केली.