ठाणे- मुंब्रा भागात शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत इमारती खाली अडकून चार जण ठार झाले. सुरूवातीला या इमारतीखाली कोणीच अडकले नसल्यानचे सांगतिले जात होते. मात्र ढिगारा उपसत असताना चार जणांचे मतदेह आढळून आले. याठिकाणी बचाव कार्य युध्दयपातळीवर सुरू आहे.
मुंब्रा रेल्वे स्टेशनजवळ ही इमारत आहे. काही जण इमारतीच्या ढिगा-याखाली अडकल्याची भिती व्यक्त होत आहे. अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुंब्रा रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या या इमारतीच्या डागडुजीचे काम सूरू होते. ढिगा-याखाली अडकल्याने या घटनेत चार जणांच बळी गेला आहे. या ढिगा-याखाली आणखी दोघे जण अडकल्याची भीती व्याक्तज केली जात आहे. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
पालिकेचे कर्मचारी आणि अग्निशामन दलाच्या कर्मचा-यांकडून ढिगारा उपासण्याचे काम सुरू आहे. गेल्या काही महिन्यात मुंब्र्यामध्ये अनधिकृत इमारती कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये ८० हून अधिक जणांचा बळी गेला आहे. सर्वाधिक अनधिकृत इमारती याच ठिकाणी आहेत.