कोकणातले निसर्ग सौंदर्य खरच वाखाणण्या जोगे आहे. याच कोकणातल्या मातीत आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या डोंगर दर्याचे दर्शन घ्यायचे असेल तर जास्त दूर जायची गरज नाही तर नारबाची वाडी तुम्हाला आपलंस करेल….मनोज मित्रा यांच्या शज्जनो बागान या गाजलेल्या बंगाली नाटकावर आधारित आहे नारबाची वाडी हा मराठी चित्रपट.
कोकण म्हंटल कि गाव आलंच आणि गावात शेती ,जमीन जुमला हा आलाच तर अश्याच शेती, जमीन जुमाल्याशी निगडीत हि कथा आहे . कोकणातला एक साधा सरळ गृहस्थ आणि आपल्या वाडीवर ,जमीन ,शेतीवर अत्यंत प्रेम करणारा नारबा( दिलीप प्रभावळकर ). पूर्वी शेतकर्यांच्या जमिनीवर मोठ मोठे सावकार नजर ठेवून असत त्याच प्रमाणे या कथेत देखील एक सावकार म्हणजेच खोत (मनोज जोशी) नाराबाच्या वाडीवर आणि जमीन जुमल्यावर नजर ठेवून होता . नारबाची वाडी मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नात खोत अपयशी ठरतात आणि पुन्हा त्याचा मुलगा तीच वाडी मिळवण्याचा प्रयत्न करत राहतो. त्यानंतर त्याचा मुलगा ( मनोज जोशी) वाडी मिळवण्याचा कसा प्रयत्न करतात…त्यासाठी कसा करार होतो.नारबाच्या मरणाची कशी वाट पाहिली जाते.आणि अखेर नारबा मरतो का?ती नारबाची वाडी खोताला मिळते का या सा-या भोवती अत्यंत खुमासदार पध्दतीने…कोकणी संवादाची मजा घेत सिनेमाची कथा खुलत गेली आहे .
दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, किशोरी शहाणे, निखिल रत्नपारखी, विकास कदम, ज्योती मालशे, कमलाकर सातपुते…अतुल परचुरे यांच्या या चित्रपटत प्रमुख भूमिका आहेत.तर अतुल परचुरे हा पाहुणे कलाकार म्हणून दिसणार आहेत. लगे राहो मुन्ना भाई , शाळा यांसारख्या चित्रपटात काम केल्यावर एक आगळी वेगळी भूमिका करणे फारच कठीण काम असते पण, दिलीप प्रभावालकारांच्या बाबतीत तसे नाही ते सर्वांचेच आवडते नट आहेत आणि त्यांनी साकारलेला नारबा हा नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. मनोज जोशींचे दोन वेग वेगळ्या रूपातील रोल नक्कीच कौतुकास्पद आहे. निखल रत्नपारखी यांनी मुनीमजी ची भूमिका चोख निभावली आहे, तर इतर सहकालाकरांनणीही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोकणातले सौदर्य आणिहिरव्यागार डोंगराच्या सौंदर्या बरोबरच त्याच लाल मातीचा सुगंध यावा अश्या रंग छटा टिपल्यात त्या कॅमेरामन राहुल जाधवने. उलाढाल, सतरंगी रे या सिनेमानंतर अगदी वेगळ्या आशयाचा हा सिनेमा करण्याचं आणि दिग्गज स्टारकास्ट घेण्याचं शिवधनुष्य आदित्य सरपोतदार याने अगदी चोख पेललंय.
चित्रपटात गाण्याशिवाय मज्जाच नसते चित्रपटातील बॅगराऊंड म्युझिक आणि दोन गाणी लिहिली आहेत ती गुरु ठाकूरने तर मंगेश धाकडे याचे लयबद्ध संगीत. कोकणातलं एकदम निखळ सौंदर्या, मनोरंजन आणि मनः शांती हवी असेल तर नारबाच्या वाडीला भेट देऊन आपला दिवसभराचा ताण या कोकणात जावून नक्कीच कमी होईल.
चित्रपट – नारबाची वाडी
निर्मिती – कल्याण गुहा, रूपाली गुहा
दिग्दर्शक – आदित्य सरपोतदार
संगीत – मंगेश धाकडे
कलाकार – दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, किशोरी शहाणे, निखिल रत्नपारखी, कमलाकर सातपुते, अतुल परचुरे
रेटिंग – * * *