विराट कोहली सीमा सुरक्षा दलाचा अॅबँसिडर

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट टीमचा मुख्य आधारस्तंभ अशी ओळख निर्माण गेलेल्या विराट कोहली आता देशातील दुसर्याक क्रमांकाच्या मोठ्या निमलष्करी दलाचा ब्रँड अँबॅसिडर बनणार आहे. पाकिस्तान आणि बांग्ला देश या देशाच्या दोन अतिसंवेदशील सीमांचे रक्षण करणार्याल सीमा सुरक्षा दलाने कोहलीची निवड ब्रँड अँबॅसिडर पदी केल्याचे जाहीर केले असून राजधानी दिल्लीत एका विशेष समारंभात त्याला हे पद दिले जाणार आहे. सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख सुभाष जोशी व अन्य वरीष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

याविषयी मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय सीमा सुरक्षा दलात अडीच लाख जवान आहेत. या दलाने प्रथमच ब्रँड अॅबॅसिडर नेमण्याचा निर्णय घेतला आहे. कोहली या निमित्ताने बीएसएफ कुटुंबात समाविष्ट होणार आहे..त्याची क्रिकेटमधील कारकीर्द उत्तम आहे तशीच सीमा सुरक्षा दलाची कामगिरीही उच्च दर्जाची आहे. यामुळे देशातील अनेक तरूण या दलाकडे वळण्याचा विचार करतील अशी आशा वरीष्ठ अधिकार्यां नी व्यक्त केली आहे. कोहलीने २०११ साली पहिली टेस्ट खेळली होती. वर्ल्ड कप विजयातही त्याचा मोठा वाटा होता आणि आयसीसी सामन्यातही विजयी कर्णधार ठरला होता.

यापूर्वी भारतीय वायू दलाने सचिन तेंडुलकर याला तर लष्कराने धोनी याला सेनेची विशेष पदे देऊन गौरविले आहे.

Leave a Comment