मेड इन इंडिया शायनिंग

नवी दिल्ली – भारतात बनलेल्या कोणत्याही इलेक्ट्रोनिक उत्पादनाला यापुढे जगात कोणत्याच देशात गुणवत्ता तपासणीची गरज भासणार नसून अन्य देशांत तयार झालेल्या इलेक्ट्रॅनिक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्पादने तपासून त्यांना सर्टिफिकेट देण्याचा अधिकार भारताला गुरूवारी प्राप्त झाला आहे. भारताने अशा उत्पादनांना दिलेले सर्टिफिकेट जगातील सर्व देशांत ग्राह्य मानले जाणार आहे.

अशा प्रकारचा दर्जा मिळविणारा भारत हा जगातील १८ वा देश बनला असल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री कपिल सिब्बल यांनी सांगितले. असा दर्जा मिळाल्यामुळे देशात इलेक्ट्रोनिक व माहिती तंत्रज्ञान उत्पादन विकासाला चालना मिळण्यास मोठाच हातभार लागणार आहे त्याचबरोबर अशा उत्पादनांच्या चाचणी प्रयोगशाळाची संख्याही वाढण्यास मदत मिळणार आहे असे सिब्बल यांनी सांगितले.