
नवी दिल्ली: मी विद्या बालनसारखी ग्लॅमरस नाही, असे उद्गार अनुराग बासू निर्मित ‘बर्फी’ या चित्रपटातून पदार्पण करणारी सुप्रसिध्द दाक्षिणात्य अभिनेत्री एलिना डिक्रूझ हीने काढले. एलिना आता राजकुमार संतोषी यांचा आगामी चित्रपट ’फटा पोस्टर निकला हीरो’ मधून पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बोलताना एलिना म्हणाली की, ‘बॉलिवूडमध्ये टिकण्यासाठी ग्लॅमरचा आधार घ्यावाच लागतो. मी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ग्लॅमरचा आधार घेतला होता आणि त्याचा माझ्या करिअरला बराच फायदा झाला.’
