पुणे -शारजा थेट विमान सेवा

jet
पुणे ,; स्पाइसजेट कंपनीने उद्यापासून पुणे -शारजा अशी थेट सेवा आठवड्यातून चार वेळा सुरु करण्याचे जाहीर केले आहे.शिर्डी , शनि शिंगणापूर येथे जाण्याला प्राधान्य दिले आहे.

स्पाइसजेटची पुण्यातून पहिली आंतरराष्ट्रीय सेवा सुरु झाल्याची घोषणा आज वरिष्ठ उपाध्यक्ष व्हि. राजा यांनी आज पत्रकार परिषदेत केली. संयुक्त अरब अमीरातींचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या शारजाला पुण्यातून थेट सेवा सुरु झाल्याने व्यापार आणि पर्यटन या दोन्हींना चांगला फायदा होणार आहे असे नमूद करून राजा म्हणाले की येत्या काही दिवसात बँकॉकला अशीच सेवा सुरु केली जाणार आहे. पुण्यातील विमानतळ आधुनिकीकरणाचे काम येत्या काही महिन्यात सुरु होणार असले तरी त्याचा आमच्या वेळापत्रकावर परिणाम होणार नाही . ही सेवा सुरु करण्यास मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे चांगले सहकार्य मिळाले आहे.

दुपारी १ २ . २ ५ वाजता येथून उड्डाण होणार असून परतीचे विमान १ . २ ५ वाजता निघून सकाळी सहा वाजता पुण्यात पोहोचेल . बोईंग ७ ३ ७ – ८ ० ० त्यासाठी वापरले जाणार असून त्याची क्षमता १ ८ ९ प्रवासी नेण्याची आहे. पहिले दोन आठवडे ६ ४ ९ ९ रुपये हा सवलतीचा दर ठेवण्यात आला आहे असे नमूद करून राजा म्हणाले की सध्या लखनौ आणि वाराणसी या शहरातून शारजाला सेवा आहे . भविष्यात मालवाहतूक सेवा देण्याचा आमचा विचार असून आखातातील तसेच आशियातील इतर विमान सेवांशी सहकार्य करण्यास आम्ही उत्सुक आहोत .

पर्यटन , शिक्षण , वाहन या क्षेत्राला नव्या सेवेचा फायदा घेत येणार आहे अशी माहिती देऊन ते म्हणाले की आम्ही नुकत्याच सुरु केलेल्या अहमदाबाद – मस्कत सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

पुण्याहून चेन्नई साठी दररोज सेवा सुरु करत असल्याचे कंपनीने यावेळी जाहीर केले. रात्री १ १ वाजता पुण्यातून निघून हे विमान १ २ . ५ ५ वाजता चेन्नई ला पोहोचेल .

Leave a Comment