रामेश्वरम – श्रीलंकेच्या नौदलाने पाल्कच्या सामुद्रधुनीमधीत मासेमारी करणार्या 19 मच्छीमारांना अटक केली आहे. या मच्छीमारांनी भारतीय हद्दीचे उल्लंघन केले होते काय, यासंदर्भातील निश्चित माहिती तत्काळ मिळू शकली नसल्याचे येथील मच्छीमार विभागाचे सहसंचालक फेलोमिन थिआगराजन यांनी सांगितले आहे.
श्रीलंकेकडून 19 भारतीय मच्छीमारांना अटक
जेजाढपट्टणम येथील पाच नावांसधून या मच्छीमारांनी समुद्रात प्रवेश केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. श्रीलंकन नौदलाकडून भारतीय मच्छीमारांना अटक करण्याच्या घटना वारंवार घडत असताना केंद्र सरकार या बाबत काहीच कारवाई करत नसल्याबद्दल तमिळनाडुच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी संताप व्यक्त केला आहे.
केंद्र सरकार या मच्छीमारांच्या सुटकेसाठी कोणताही सुनियोजित प्रयत्न करत नसल्याचा आरोपही जयललिता यांनी केला आहे. येथील स्थानिक मच्छीमारांच्या संघटनेनेही श्रीलंकन नौदलाच्या या कारवायांचा तीव्र निषेध नोंदविला असून केंद्र सरकारने या प्रकरणी हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.