मराठी चित्रपट निर्माते माधव नाईक यांचे निधन

पुणे, –अभिनेत्री आशा काळे यांचे पती व समाजप्रबोधनात्मक माहितीपट, लघुपट आणि मराठी चित्रपट निर्माते माधव नाईक यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांचे ते पती होत.

अस्वस्थ वाटू लागल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी (दि. 18) पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. माधव नाईक यांना लहानपणापासून चित्रपटांची आवड होती. त्यांचे वडिल पांडुरंग नाईक हे तत्कालीन ‘हंस पिक्चर्स या बड्या निर्मिती संस्थेत भागीदार होते. त्यांच्याकडूनच माधव नाईक यांनी चित्रपट दिग्दर्शन, निर्मितीचे प्रथमिक धडे घेतले. त्यानंतर त्यांनी जाहिरात, लघूपट, माहितीपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली. राजा दिनकर केळकर वस्तूसंग्रहालयावर त्यांनी केलेल्या लघुपटाला शासनाचा पुरस्कारही मिळाला होता. तसेच ए. ओ. एजन्सी मार्फत त्यांनी अनेक चित्रपटांचे वितरण केले.

Leave a Comment