वॉशिंग्टन – सर्वसाधारणपणे आजारी पडणार्या लोकांची पाहणी केली असता ब्रेकफास्ट न करणारे लोक आजाराला अधिक बळी पडतात असे आढळते. मात्र ब्रेकफास्ट करताना काही पथ्ये पाळली नाहीत तर ब्रेकफास्टचे फायदे होत नाहीत असेही आढळले आहे. तेव्हा ब्रेकफास्ट करताना खालील पथ्ये पाळली पाहिजेत. १. फळांचा रस पिण्याऐवजी अख्खे फळ तसेच खा आणि वरून पाणी प्या. फळांचा रस करताना त्यातली काही पौष्टिक द्रव्ये निघून जात असतात. २. माणसाने डाएटिंग करावे परंतु ब्रेकफास्टच्या बाबतीत डाएटिंग करू नये. ब्रेकफास्ट मजबुत असावा. लहान मुलासारखा तो छोटा नसावा. ३. ब्रेकफास्टला काय खावे याबाबतीतसुध्दा पथ्य पाळले पाहिजे. ब्रेकफास्टमध्ये जास्त तेलकट पदार्थ खाऊ नयेत.
ब्रेकफास्टच्या बाबतीत पाळावयाची पथ्ये
४. काही लोकांना ब्रेकफास्ट झाल्यानंतर छान पैकी कॉफी पिण्याची सवय असते एक कप कॉफी पिल्याने तरतरी येते पण त्यापेक्षा अधिक कॉफी पिल्यास दुष्परिणाम व्हायला लागतात. ५. ब्रेकफास्ट हा आरोग्यदायी आहाराचा असावा. एखादी उसळ जरूर खावी. तळलेले पदार्थ खाऊ नयेत. ६. ब्रेकफास्ट आवश्यकच आहे का असा प्रश्न काही लोक विचारतात पण तो चुकीचा आहे. असा प्रश्न मनात आणू सुध्दा नये.
७. ब्रेकफास्ट एनर्जीसाठी आवश्यक असतोच परंतु तो एवढा पोटभरही असू नये की तो केल्यानंतर सुरसुरी यावी किंवा झोप घ्यावीशी वाटावी. ८. ब्रेकफास्ट घेण्याच्या आधी भल्या सकाळी एक ग्लासभर पाणी प्यावे. त्यामुळे शरीरातून गेलेले पाणी भरून निघते आणि पचनशक्तीला मदत होते. भरपूर पाणी पिले की भरपेट नाश्ता करण्याचा मोह टळतो. ९. ब्रेकफास्टच्या सोबत ग्रीन टी घ्यावा. एखादे अंडे घ्यावे. एखादे फळ जरूर खावे.