मुंबई : बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा आपण उत्सुक असल्याचे एन. श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सभेत २९ सप्टेंबरला कार्यकारिणीच्या निवडणुका होणार आहेत. या पदासाठी बरीच मंडळी उत्सुतक असताना पुन्हाव एकदा आपण इच्छुक असल्याचे सांगून श्रीनिवासन यांनी सर्वांना पेचात टाकले आहे.
त्यामुळे आता श्रीनिवासने बोर्डाच्या अध्यक्षपदावर एका वर्षाच्या दुस-या टर्मसाठी निवडणूक लढवणार हे आता नक्की झाले आहे. काही दिवसांपूर्वी श्रीनिवासन यांनी दक्षिण भारतातील बीसीसीआय सदस्यांची बैठकही घेतली होती. गोवा आणि आंध्र प्रदेशमधील क्रिकेट असोसिएशन्सचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित राहीले नसल्याचे वृत्त आले होते.मात्र काही दिवसांपूर्वी आलेले हे वृत्त श्रीनिवासन यांनी फेटाळून लावले आहे.
आपण आगामी काळात अध्यक्षपदाची निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता आगामी काळात होणा-या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागून रहिले आहे.