बीसीसीआयचे माजी सचिव जयवंत लेले यांचे निधन

वडोदरा- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी सचिव जयवंत लेले यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. गुजरातमधील वडोदरा येथे लेले यांचे निधन झाले. ते ७५वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी आहे.

तीन दिवसांपूर्वीच जयवंत लेले यांनी ७५ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता. लेले यांनी १९९६ ते २००१ या कालावधीत बीसीसीआयचे सचिव म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या या कालावधीत क्रिकेटला बदमान करणारे मॅच फिक्सिंग प्रकरण उघडकीस आले होते.

त्यांचे `व्हेन आय वॉझ देअर` हे त्यांचे आत्मचरित्र गाजले होते. या आत्मचरित्रातून त्यांणनी मॅच फिक्सिंग प्रकरणावर भाष्य केले होते. त्यामुळे त्यांच्या या पुस्तकामुळे फिक्सिंग प्रकरणातील अनेक घटनाक्रम उघड झाला होता. त्यांच्या निधनामुळे देशाच्या क्रिकेट क्षेत्राची मोठी हानी झाला आहे अशी प्रतिक्रिया काही जणांनी दिली आहे.

Leave a Comment