तामिळनाडूत श्रीकृष्णाचे आगळे वेगळे मंदीर

krishna

चेन्नई – तामिळनाडूतील काही श्रीकृष्ण भक्तांनी चेन्नई शहरालगत असलेल्या मनाली या उपनगराजवळील अरियालूर या धार्मिक क्षेत्राच्या ठिकाणी श्रीकृष्णाचे आगळे वेगळे मंदीर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या मंदिराचे नाव चर्तुर्वेद नवनीत संथाना कृष्णन् असे असेल. या मंदिरातील चार गायींच्या मूर्ती चार वेदांचे प्रतिक म्हणून उभारण्यात येतील. त्या या चारही गायी श्रीकृष्णाच्या मुख्य मूर्तीच्या बाजुला उभ्या असतील.

Krishna-Temple

(फोटो सौजन्य – ThinkBangalore)

भगवान श्रीकृष्ण हा विष्णूचा अवतार मानला जातो आणि गरूड हे विष्णूचे वाहन आहे. त्यामुळे या मंदिरात गरूडाची मूर्ती आहे परंतु अन्य मंदिरात गरूड उभा दाखवतात. या मंदिरात बसलेला दाखवण्यात येणार आहे हा गरूड श्रीकृष्णाची पूजा करताना दिसेल. या मंदिर संस्थानचे प्रमुख व्ही. सुब्रमण्यन पेराम्बूर यांनी हे मंदिर अतीशय साधे असेल असे सांगितले.

Krishna-Temple1

या मंदिराला जोडून एक गोशाळा उभी केली जाईल आणि मंदिरात येणार्‍या भक्तांना गायींना चारा देण्यास प्रोत्साहित केले जाईल. चारही गायीच्या मंदिरातल्या मूर्ती आणि श्रीकृष्णाची मूर्ती स्थपती शंकर नारायणन या मूर्तीकाराकडून करवून घेतल्या जात आहेत.

Leave a Comment