कोरियात बनतेय जगातील पहिली अदृष्य स्कायस्क्रॅपर

सोल – टॉवर इन्फिनिटी या नावाने दक्षिण कोरियाची राजधानी सोल जवळ विमानतळानजीक जगातल्या पहिल्या अदृष्य स्कायस्क्रॅपरचे काम आता सुरू होत असून ही इमारत ४५० मीटर उंचीची व संपूर्ण काचेत बनविली जात आहे. वास्तुरचनाकाराने या इमारतीचे डिझाईन २००४ मध्येच तयार केले होते मात्र त्याच्या बांधकामाला आत्ता परवानगी दिली गेली आहे.

ही इमारत केवळ मनोरंजनासाठी उभारली जात आहे. हा टॉवर जगातला दोन नंबरचा उंच टॉवर असून त्याचा टेहळणी मनोरा ३९२ मीटर उंचीवर असणार आहे. चीनमधील गुंगडाँग येथे उभारला गेलेला कँटन टॉवर ४८८ मीटर उंचीचा आहे व तो जगातील सर्वात मोठा टॉवर मानला जातो. कोरियात उभारला जात असलेला टॉवर इन्फिनिटी एलइडी लायटिग व कॅमेरे यांच्या मदतीने अदृष्य होणार आहे. कॅमेरे व एलइडी आणि काचेचा वापर यामुळे या टॉवरची प्रतिमा दिसणार नाही मात्र आत असलेल्या लोकांना बाहेरचे सर्व दृष्य स्पष्ट पाहता येणार आहे.

या टॉवरमध्ये रोलर कोस्टर वॉटर पार्क, रेस्टॉरंटस, लग्नसमारंभासाठी हॉल, लँडस्केप गार्डन इत्यादी सुविधा देण्यात येणार आहेत. यात बसविण्यात येणार्या् ऑप्टिकल कॅमेर्यां्मुळे लिफ्टमधूनही लोक जगभरातील विविध प्रतिमा पाहू शकणार आहेत कारण लिफ्टच्या भिंतीच ठराविक उंचीवर प्रत्यक्ष दृष्यात बदलू शकणार आहेत. जगातील सर्वाधिक उंचीच्या दहा इमारतींत या टॉवरचा समावेश होणार आहे. कोरियाच्या जगातील चढत चाललेल्या प्रतिमेचे प्रतीक म्हणून हा टॉवर बांधला जात असल्याचेही सांगितले जात आहे.