ऐतिहासिक गणेशविसर्जन मिरवणुकीत पुण्यात गणपतीला भावपूर्ण निरोप

पुणे,: पुण्यातील ऐतिहासिक गणेशविसर्जन मिरवणुकीस आज सकाळी दहा वाजता म.फुले मंडईतून सुुरुवात झाली. गेले एकशेवीस वर्षे जे गणपती मानाचे म्हणून मानले जातात, त्या कसबा गणेश, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा हे ते मानाचे गणपती त्यांची पूजा महापौर चंचला कोद्रे आणि पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुरेश कलमाडी, आमदार गिरीश बापट यांच्या हस्ते झाली आणि मिरवणुकीस आरंभ झाला. तेथून सिटीपोस्टचौक मार्गे मिरवणूक लक्ष्मीरोडने निघाली. पहिला म्हणजे कसबा मंडळाचा गणपती लकडीपूलचौकात येण्यास दुपारचा एक वाजला. तीन तासात ही मिरवणूक वेगाने आली असे म्हणायचे कारण म्हणजे पुढचे मानाचे चार गणपती यांचे विसर्जन होण्यात रात्रीचे सात वाजले. मिरवणूक अतिशय संत गतीने पुढे जात आहे.

यावर्षीच्या गणपती मिरवणुकीचे वैशिष्ठ्य म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग. ढोळ वाजवण्यात महिला हिरीरीने पुढे आहेत. दुसरे असे प्रत्येक गणपतीपुढे ढोलांची व ध्वज धारकांची सं‘या मोठी आहे. मिरवणुकीची चलचित्रे वाहिन्यावर दाखविली तर गर्दी कमी होते असा आजपयर्र्ंतचा अनुभव पण त्याच कारणाने आज मिरवणुकीची गर्दी वाढली होती कारण प्रत्येक चौकात एकेका वाहिनी कंपनीने प्रत्येक चौकात स्थिर कॅमेरे ठेवून काही कॅमेरे फिरते ठेवले होते त्यामुळे मिरवणुकीतील तरुणाबरोबर दर्शकातील तरुणही मोठ्या प्रमाणावर नाचण्यात सहभागी झाले होते.

दरवर्षी ही मिरवणूक संपायला तीस तास लागतात.पोलीस जेवढे ती लवकर संपण्याचा प्रयत्न करतात तेवढा उशीर अधिक लागतो. म्हणून पोलिसांनी मिरवणूक वेगाने पुढे न्या, असे सांगणेच सोडून दिले होते. यावेळी अजून एका बाबीची काळजी मंडळांनी घेतली आहे की, शहरातून तीन मिरवणुकांना परवानगी दिली आहे. टिळक रोडे व कुमठेकर रोड यां मार्गानीही मिरवणुका सुरु झाल्याने मिरवणूक जरा लवकर संपण्याी आशा आहे.

दुपारी चार ते पावणेपाच यावेळेत पुण्यात जोराचा पाउस आल्याने मिरवणुकीत हिरमोड झाला . पण पाच वाजता पुन्हा जोमाने मिरवणूक सुरु झाली. या वेळी अनेक विदेशी महिला प्रामु‘याने डेन्मार्कच्या महिला मोठ्या सं‘येने नऊ वारी साडी व नथ घालून मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. त्याच प्रमाणे मंगळागौरीच्या रात्री जागवतानाचे खेळ यावेळी रस्त्यावर खेळले जात होते.

एक एक किमी लांबीची रांगोळी हे तर वैशिष्ठ्य होतेच त्याच बरोबर अनेक राज्यातील महिलांनी या मिरवणुकीत पारंपारीक नृत्ये सादर केली. पुण्यात अन्य राज्यातील व अन्य देशातील विद्यार्थ्यांची सं‘या मोठी असल्याने व त्यांनी त्यांच्या पारंपारिक वेशात येण्याचे ठरविल्याने यावर्षीच्या मिरवणुकीला अधिक नाविन्य आले होते. या मिरवणुकीत नगरसेवक महिलांनीही फुगड्या खेळून घेतल्या.

Leave a Comment