आमिर खान-अनुष्का शर्माचा नवा रेकॉर्ड

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा किस नवीन रेकॉर्ड करणार आहे. यामध्ये किस, लिप लॉप किसचा मसाला पाहायला मिळणार आहे. सिनेमा पीकेमध्ये किसचा जलवा पाहायला मिळेल. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये किसची गरमागरम दृश्ये दाखविणे एक सिनेमाचे अंग होऊन गेले आहे. इम्रान हाश्मी याने किसचा रेकॉर्ड केला होता. त्यात तो माहीर असल्याचे म्हटले जाते. तर याच महिन्यात रिलीज झालेला ‘शुद्ध देसी रोमांस’मध्ये किसवर भर देण्यात आला होता. नवोदीत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने किसमध्ये बाजी मारली होती. त्यांने या सिनेमात २७ वेळा किस करून हंगामा माजविला. यात लिप-लॉक किस याचाही समावेश आहे.

आगामी पीके फिल्ममध्ये आमिर खान आणि अनुष्का शर्मा बॉलिवूडमध्ये चुंबन रेकॉर्ड करण्याच्या तयारीला लागले आहेत. सांगितले जात आहे की, २७ पेक्षा जास्त किस या सिनेमात असणार आहेत. त्यामुळे सुशांत सिंगचा नवा रेकॉर्ड आमिर मोडण्याची शक्यता आहे. राजकुमार हिरानी याचा नवा सिनेमा पीके येत आहे. यामध्ये प्रमुख भूमिका आमिर खान आणि अनुष्का करणार आहे. यामध्ये दिर्घ चूंबन सीन असणार आहे. आमिरने याआधी अन्य अभिनेत्रींबरोबर किस केले आहेत. मात्र, अनुष्काबरोबर पहिल्यांदाच किसचे दृश्य असणार आहे.

Leave a Comment