केद्रातून आदेश आल्याने मीरा कलमाडींना शस्त्रपरवाना

पुणे – गेल्या दोन महिन्यात पुणे पोलिसांकडे शस्त्र परवाना मिळण्यासाठी महिला वर्गाकडून आलेल्या अर्जांमधून फक्त मीरा कलमाडी यांनाच हा परवाना मंजूर झाला असल्याचे समजते. सध्या मीराताईंचे शस्त्र कसे वापरायचे याचे ट्रेनिग सुरू असून मीरा कलमाडी काँग्रसचे पुण्याचे खासदार व राष्ट्रकुल घोटाळ्यातील आरोपी सुरेश कलमाडी यांच्या पत्नी आहेत.

यासंबंधी पुणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मीरा कलमाडी यांच्याप्रमाणेच अन्य सहा महिलांनीही शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता. मीरा कलमाडींसह सर्वच अर्ज पोलिसांनी नामंजूर केले होते. मात्र कलमाडी यांनी केंद्रीय पातळीवरून हा अर्ज मंजूर करून आणल्यामुळे मीरा कलमाडी यांना शस्त्र परवाना दिला गेला आहे. ऑगस्ट २०१३ पर्यंत पोलिसांकडे एकूण १५० अर्ज आले होते.

मीरा कलमाडी यांनी त्यांना धमक्या येत असल्याने जिवाला धोका आहे म्हणून शस्त्र परवाना मिळावा असा अर्ज केला होता. स्वसंरक्षणासाठी त्यांनी हा परवाना घेतला आहे. पुणे पोलिसांच्या अखत्यारीत आत्तापर्यंत ११०३५ जणांना परवाने दिले गेले आहेत. मात्र आजकाल महिलांकडून शस्त्रपरवाना मिळण्यासाठी येत असलेल्या अर्जाचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले असल्याचेही सांगण्यात आले आहे. यात रियल इस्टेट क्षेत्रातील कार्यरत महिला, उद्योजक महिला व आय टी क्षेत्रातील महिलांचे प्रमाण अधिक आहे. पर्समध्ये मावू शकेल अशा छोट्या पिस्तुल परवान्यासाठी महिला पसंती देत असल्याचेही समजते.

Leave a Comment