व्हाइट हाऊसमध्ये फेकले फटाके

वॉशिंग्टन- वॉशिंग्टन येथील नौदल मुख्यालयात गोळीबार सुरू असतानाच एका व्यक्तीने अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाइट हाऊस’मध्ये फटाके फेकले. या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

या घटनेनंतर व्हाइट हाऊसमधील कर्मचा-यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलबण्यात आले. फटाक्यांचा आवाज आल्यानंतर या परिसरात असलेल्या पत्रकारांना गोळीबार झाल्यासारखे वाटले. सिक्रेट सर्व्हिस एजंटनी तातडीने व्हाइट हाऊसच्या उत्तरेकडील सर्व गवत पूर्णपणे कापून टाकले.