लालबागचा राजा’चा कार्यकर्ता अटकेत

मुंबई- लालबागच्या राजाच्या बंदोबस्तासाठी रविवारी ड्युटीवर असताना अशोक सरमारे या पोलिस उपनिरीक्षकाला मारहाण केल्याबद्दल दोन कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मनोज शर्मा याला काळाचौकी पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली.

तसेच दर्शनाला गेलेल्या महिलेला धक्काबुक्की झाल्याची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या मदतीने संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

त्याचबरोबर, लालबागचा राजा’च्या दशर्नासाठी येणा-या भक्तांचा अवमान होणार नाही याची काळजी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी घ्यायला हवी. महिलांशी असभ्यपणे वागणा-या कार्यकर्त्यांबाबत कोणाच्या तक्रारी असतील तर संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराही राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिला आहे.

Leave a Comment