डेहराडून – केदारनाथ मंदिरातील पूजाअर्चा लवकरात लवकर सुरू व्हाव्यात म्हणून या मंदिराच्या भोवतालचे बांधकाम साहित्य आणि अवशेष युध्दपातळीवरून हटवण्यात आले आणि गेल्या महिन्यात नित्य पूजा सुरू झाली. परंतु हे अवशेष हटवताना त्यात १ कोटी ९० लाख रुपये एवढी रोख रक्कम असलेले बँकेचे लॉकर सापडले. ते ताबडतोब वेगळे करण्यात आले.
हे लॉकर स्टेट बँक ऑफ इंडियाचे असून ते हस्तगत केल्यानंतर सर्वांच्या समक्ष उघडण्यात आले तेव्हा त्यात १ कोटी ९० लाख रुपयांची रोकड सापडली. ती रक्कम बँकेकउे सुपूर्द करण्यात आली. अशाच प्रकारचे एक बँक लॉकअर चामोली येथेही सापडले. तेही स्टेट बँक ऑफ इंडियाचेच होते. त्यात ३३ लाख रुपये होते. हीही रक्कम या बँकेकडे सुपूर्द करण्यात आली आहे.