
न्यूयॉर्क – भारतीय वंशाची नीना दवूलरी हिच्यावर अमेरिकेत वर्णभेदाची शेरेबाजी करण्यात येत आहे. मिस अमेरिका किताब पटकावल्यानंतर ट्विटरवर नीनावर वर्णभेदाची टीका करण्यात आली आहे. मात्र या टीकेची पर्वा नसल्याचं नीनानं म्हटले आहे.
ट्विटरवर तिला भारतीय डॉग म्हणून संबोधल गेलं आहे. मात्र, तिने टीकेकडे दुर्लक्ष करून आपला आनंद साजरा केला आहे. मिस अमेरिका या अमेरिकन सौंदर्य स्पर्धेत 24 वर्षांची नीना दावुलुरी या भारतीय युवतीनं विजय मिळवला आहे. तिने बॉलीवूड फ्यूजन नृत्य करून परीक्षकांना प्रभावित केलं.
अमेरिकेत मिस अमेरिका ही सौंदर्य स्पर्धा आयोजित करणार्या संघटनेनं विविध वंशाच्या युवतींना ही संधी प्राप्त करून दिल्यामुळं मला हा सन्मान मिळाला असून मी अत्यंत आनंदात आहे, असे नीनाने सौंदर्यवतीचा मुकुट मिळाल्यानंतर घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. नीनाला डॉक्टर व्हायचं असून मिस अमेरिका हा किताब मिळाल्यानं तिला 50 हजार डॉलरची शिष्यवृत्ती मिळणार आहे.