नवी दिल्ली- मोबाइल उत्पादकांमधील आघाडीची कंपनी असलेल्या नोकियाने केवळ 29 डॉलर्समध्ये (1800 रुपये) पहिला कॅमेरा फोन लाँच केला आहे. नोकिया 108 आणि नोकिया 108 डयुअल सिम या दोन्ही फोनमध्ये कॅमेरा असून त्यांची किंमत करांशिवाय 29 डॉलर आहे.

अजूनही कॅमेरा फोन घेणा-या ग्राहकांची संख्या जास्त आहे. अशा कोटयवधी लोकांना परवडण्याजोग्या किमतीत मोबाइलमध्ये कॅमे-याचाही अनुभव घेता यावा, यासाठी नोकियाकडून हा मोबाइल बाजारात आणण्यात आला असल्याचे कंपनीच्या मोबाइल फोन विभागाचे उपाध्यक्ष टिमो टॉयकनेन यांनी सांगितले.
नोकिया 108 आणि नोकिया 108 डयुअलसिम हे दोन फोन कंपनीची वचनपूर्ती करतील, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत हे दोन्ही फोन विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार आहेत.
कॅमेरा असलेले नोकियाचे हे सर्वात कमी किमतीचे मोबाइल फोन्स आहेत. यामध्ये 32 जीबीची स्टोअरेज क्षमता असून एक सिमकार्ड असलेल्या मोबाइलची बॅटरी 31 दिवस (स्टँडबाय) तर डयुअल सिम मोबाइलची बॅटरी 25 दिवस (स्टँडबाय) पुरेल, असा दावा कंपनीने केला आहे.