काकांनीच अनेकांची घरफोडली- धनंजय मुंडे

बीड: आमचे काका (म्हणजेच गोपीनाथ मुंडे) हेच खरे घरे फोडणारे आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील मोहिते – पाटील, शिवाजीराव पाटील-निलंगेकर, उदयनराजे भोसले यांची घरे फोडण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांना अजित पवार यांच्यावर घरफोडले असा आरोप करण्याचा अधिकार नाही, अशी टीका आमदार धनंजय मुंडे यांनी केली.

आमदार धनंजय मुंडे यांनी विधानपरिषद निवडणूकीत विजय मिळवल्यानंतर परळीत उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन केले. यावेळी त्यांनी काका गोपीनाथ मुंडें यांच्यामवर जोरदार हल्लाबोल केला. अजित पवार हे फोडाफोडीचे राजकारण करतात, या गोपीनाथ मुंडेंच्या टीकेचा धनंजय यांनी चांगलाच समाचार घेतला.

परळी शहरात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सत्कारानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. राष्ट्रवादीच्या तीन मंत्र्यांसह १८ आमदार, प्रदेशाध्यक्ष, अनेक माजी खासदार, आमदार, पक्षाचे विविध नेते असा मोठा लवाजमा परळीत उपस्थित होता.